Ad will apear here
Next
शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंततपासणी
डॉ. एस. आर. घाणेकर विद्यार्थ्यांची दंत तपासणी करताना

पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यामंदिरातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. 

डॉ. हेमंत लेंडे मार्गदर्शन करताना

डॉ. एस. आर. घाणेकर, डॉ. हेमंत लेंडे यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी,  दातांची नियमित स्वच्छता कशी ठेवावी, कोणते पदार्थ जास्त खाऊ नयेत, आहारामध्ये कोणते पदार्थ असावेत यासंदर्भात मुलांना; तसेच पालकांनाही मार्गदर्शन केले. मुलांच्या दातांची तपासणी करून, पुढील औषधोपचाराची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना पालकांसोबत जिल्हा रुग्णालयात येण्याचे आवाहन केले. 

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव आणि सर्व वर्गशिक्षकांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला. कार्यकमाचे प्रास्ताविक प्रा. नलिनी पाचर्णे यांनी केले. डॉ. हर्षद जाधव यांनी आभार मानले. अर्थशास्त्र विभागातील सागर आढाव, विलास राऊत, सचिन शेळके या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZZOCD
Similar Posts
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मुलगी झाली हो!’ नाट्याचा प्रयोग पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकायत सामाजिक संस्था आणि मराठी विभाग यांच्या वतीने ज्योती म्हापसेकर लिखित ‘मुलगी झाली हो!’ या नाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गुरुवार, पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाहू कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. शोभा इंगवले उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन नुकतेच कार्यक्रमाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे डायरेक्टर डॉ. विजय खरे यांच्या उपस्थितीत झाले
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा पुणे : विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी रयत शिक्षण संस्था व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे गेली अनेक वर्ष आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, तसेच त्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language